Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या लेकीची छेडछाड; यात्रेत व्हिडिओ काढला, गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका जत्रेत शुक्रवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे रक्षा खडसे आक्रमक झाल्या असून छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.