Raj Thackeray : राज ठाकरेंची मनसे मेळाव्यात घोषणा; मराठी माणसाच्या चांगल्यासाठी काम करणार असतील तर फडणवीसांना पाठिंबा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी देशातील नदी प्रदूषण, यासोबतच राज्यात सुरू असलेला हिंदू-मुस्लिम तणाव, औरंगजेबाच्या कबरीचा वाद यावर भाष्य केले. यासोबतच राज ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.