निम्मे लोक भाजपमध्ये जाईपर्यंत राहुल गांधी आणि गुजरात काँग्रेसचे नेते झोपले होते का??
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यात तिथल्या काँग्रेस नेत्यांशी आणि समाजातल्या विविध घटकांशी चर्चा आणि विचार विनिमय करून अहमदाबादच्या “झेड” हॉलमध्ये भाषण करताना स्थानिक काँग्रेस नेत्यांना झापले. निम्म्याहून अधिक लोक काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेत. आजही काँग्रेस मधले काही लोक पक्षात राहून भाजपचे काम करतात.