काँग्रेसने केलेल्या तपासाच्या आधारावर राहुल गांधींची निवडणूक अधिकाऱ्यांना धमकी; कर्नाटकात मतदान चोरीची सोडली पुडी!!
कर्नाटकात मतदान चोरीची सोडून पुडी; राहुल गांधींची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमकी!!, असला प्रकार आज संसदेबाहेर घडला.
कर्नाटकात मतदान चोरीची सोडून पुडी; राहुल गांधींची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमकी!!, असला प्रकार आज संसदेबाहेर घडला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हटले आहे, यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी वस्तुस्थिती सांगितली आहे.
ऑपरेशन सिंदूर’वरील लाेकसभेतील चर्चेत अमेरिकेचे अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांचा एकेरी उल्लेख करत त्यावरून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना उकसविण्याच प्रयत्न लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधींकडून नरेंद्र मोदींची इंदिरा गांधींची टक्केवारीत तुलना; पण नातू आजीकडून का काही शिकेना??, असा सवाल विचारायची वेळ राहुल गांधींच्या आजच्या लोकसभेतल्या भाषणातून समोर आली.
operation sindoor वरच्या संसदेतल्या चर्चेत सरकारला धरले धारेवर; पण काँग्रेसमध्ये वजाबाकीचे राजकारण जोरावर!!, असे म्हणायची वेळ राहुल गांधींच्या धोरणामुळे आली.
भाषा उच्च अर्थतज्ज्ञांची; प्रत्यक्षात भलामण चिनी मालाची!!, असेच चित्र लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वेगवेगळ्या राजकीय कृतींमधून समोर आली.
राहुल गांधी यांची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे, नैराश्याचे आणि त्यांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे भाजपचे नेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे मोदी, ‘शो’ नाहीतर ‘विकासाचा रोड शो’ असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करत त्यांच्यासाठी ‘गुब्बारा’ शब्द वापरला होता. यावरुन बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.
काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाच्या पुढे झुकण्याची परंपरा जुनी आहे. पण काँग्रेस नेते उदित राज यांनी लोचटगिरीची कमाल केली आहे. राहुल गांधी जर ओबीसींच्या हक्कांसाठी लढले, तर ते ‘दुसरे आंबेडकर’ ठरू शकतात,” असे विधान उदित राज यांनी केले आहे.
अरे बाप रे, हे काय झाले??; सावरकरांना माफीवीर म्हणता म्हणता राहुल गांधी स्वतःच माफीवीर होऊन बसले!!, असं म्हणायची वेळ राहुल गांधींच्या एका वक्तव्याने आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या दिवशी पंतप्रधान पदावर राहण्याचा इंदिरा गांधींचा विक्रम मोडला, नेमका त्याच दिवशी त्यांचे नातू राहुल गांधींनी OBC भागिदारी महासंमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
राहुल गांधींची फाडाफाडी; काँग्रेसला डब्यात घालणारीच!!, असे म्हणायची वेळ त्यांनी केलेल्या आजच्या फाडाफाडीमुळे आली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाग घेतल्यानंतर बाहेर पडलेल्या राहुल गांधींनी बुधवारी ऑपरेशन सिंदूरवर केंद्र सरकारला प्रश्न विचारले. राहुल म्हणाले- सरकार म्हणते की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ते थांबवण्याचा दावा केला आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला आता काँग्रेस विरोध करत आहे. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध वाराणसीमध्ये खटला दाखल केला जाणार आहे. सोमवारी वाराणसीच्या एमपी-एमएलए न्यायालयाने माजी पंतप्रधानांनी दाखल केलेली याचिका स्वीकारली. राहुल गांधींवर अमेरिकेत शिखांविरुद्ध प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर दुसऱ्यांदा, इंडिया अलायन्सचे नेते १९ जुलै (शनिवार) संध्याकाळी भेटणार आहेत. तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) त्यात सहभागी होणार नाहीत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडावे, असे म्हटले आहे.
मंगळवारी दुपारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लखनौ न्यायालयात आत्मसमर्पण केले. ५ मिनिटांनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आलोक वर्मा यांनी राहुल यांना २०,००० रुपयांच्या दोन जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. राहुल यांच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता, जो न्यायालयाने स्वीकारला. राहुल सुमारे ३० मिनिटे न्यायालयात थांबले.
राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वाशी संबंधित जनहित याचिकेत शुक्रवारी एक नवीन ट्विस्ट आला. याचिकाकर्ते एस. विघ्नेश शिशिर यांनी लखनौ उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यामध्ये लंडन, व्हिएतनाम आणि उझबेकिस्तानमधून मिळालेले नवीन व्हिडिओ आणि कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.
बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण विरोधात (एसआयआर) बुधवारी विरोधी पक्षांनी राज्यभर निदर्शने केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह आघाडीचे विरोधी पक्षनेते पाटण्यातील निषेधात सहभागी झाले. विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला की निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने सुरू केलेली ही प्रक्रिया ‘मोठ्या संख्येने मतदारांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवेल,’ ज्याचा सत्ताधारी एनडीएला फायदा होईल.
विरोधी पक्षांनी आणि डाव्या कामगार संघटनांनी आज भारत बंद पुकारला होता. त्याचा परिणाम संपूर्ण देशभर तर काही दिसला नाही तो फक्त काही विशिष्ट राज्यांमध्येच दिसला.
राहुल गांधींच्या कामाचा लेखाजोखा; लोकसभेत तर बोलले कमीच, पण विरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळीत तरी कुठे लागला दिवा??, असा सवाल विचारायची वेळ राहुल गांधींच्या विरोधी पक्ष नेत्याच्या परफॉर्मन्स वरून आली.
लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याच्या वर्षभराच्या कामाचा लेखाजोखा; संसदीय भाषणे सगळ्यात कमी, बाकीच्याच कार्यक्रमांचा गाजावाजा!!, हे सत्य दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या अहवालातून समोर आले नसून दस्तूर खुद्द राहुल गांधींच्या सोशल मीडिया अकाउंट वरून उघड झाले आहे.
स्वातंत्र्यापासून गांधी-नेहरू कुटुंबाचा काँग्रेसवरील प्रभाव दुर्लक्षित करता येणार नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर दशकांमागून दशके तो वाढतच गेला. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या निधनानंतर आणि त्यानंतर नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर काही वर्षांसाठी हा प्रभाव थोडा कमी झाला. परंतु, सामान्य जनतेमध्ये काँग्रेस म्हणजे गांधी कुटुंब होते.
निवडणूक आयोगाने (EC) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी त्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. ANI नुसार, हे पत्र १२ जून रोजी मेलद्वारे आणि राहुल यांच्या निवासस्थानी देखील पाठवण्यात आले.
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नाही तर राहुल गांधी यांच्या अपमानास्पद पराभवाचे दुःख वाढले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते अजून किती काळ हवेत बाण सोडत राहणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.