राहुल गांधी अमेठीत पडले, तेजस्वी यादव राघोपूर मध्ये हरतील; प्रशांत किशोर यांच्या दाव्याने बिहार निवडणुकीत ट्विस्ट
बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही अजून काँग्रेस – राजद महागठबंधन किंवा भाजप महायुती जाहीर झालेली नाही म्हणजे त्यांचे जागावाटप झालेले नाही. तरीदेखील जिंकून येण्याच्या आणि पराभव करण्याच्या दाव्यांना उत आला असून त्यामध्ये निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी केलेल्या दाव्यामुळे भर पडली.