Rahul Gandhi : राहुल गांधींपाठोपाठ आता थोरात-पवारांचेही निवडणूक आयोगावर आरोप !
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद बोलवून तीन राज्यात मतदान चोरी झाल्याचा आरोप निवडणूक आयोगावर लावला. यामुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलंय. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु झालाय. अशातच, राहुल गांधींपाठोपाठ आता रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.