Salman Khan : सलमान खान पंजाब पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला, बचाव कार्यासाठी 5 बोटी पाठवल्या, गावेही दत्तक घेणार
पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुढे आला आहे. अभिनेत्याच्या फाउंडेशनने पूरग्रस्त मदतीसाठी ५ बोटी पाठवल्या आहेत. आम आदमी पक्षाचे सरचिटणीस आणि पंजाब पर्यटन अध्यक्ष दीपक बाली यांनी पूरग्रस्त फिरोजपूर गावाला भेट दिली आणि सलमान खानच्या स्वयंसेवी संस्थेने पाठवलेल्या बोटी प्रशासनाला सुपूर्द केल्या. यापैकी २ बोटी फिरोजपूर सीमेवर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित बोटी राज्यभरातील बचाव कार्यात वापरल्या जातील.