पुणे जिल्ह्यातच पवारांच्या राष्ट्रवादीने टाकली नांगी; दोन खासदार असूनही नगरपरिषदांच्या निवडणुकीत उडाली दांडी!!
राज्यातल्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असताना पुणे जिल्ह्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नांगी टाकली. एकेकाळी फक्त पवार आणि पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार असून सुद्धा स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने आत्मविश्वास गमावला. म्हणूनच दोन-तीन ठिकाणचा अपवाद वगळता पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊ शकली नाही.