Prime Minister Narendra Modi’ : स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्या, ‘स्वदेशी मेळे’ भरवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
आगामी सणासुदीच्या काळात भारतीय वस्तूंना प्राधान्य देऊन देशी उद्योगांना बळकटी मिळवून द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एनडीए खासदारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात ‘स्वदेशी मेळे’ आयोजित करावेत. यामधून स्थानिक उत्पादक, कारागीर, लघुउद्योग, महिला स्वयं-सहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल.