Prime Minister Modi : पंतप्रधान मोदींची काश्मीरला मोठी भेट, १९ एप्रिलपासून धावणार वंदे भारत ट्रेन
१९ एप्रिल हा दिवस भारतीय रेल्वेसाठी ऐतिहासिक असणार आहे. या दिवशी मोदी सरकार जम्मू आणि काश्मीरला राज्यातील पहिली वंदे भारत ट्रेन देणार आहे. पंतप्रधान मोदी जम्मू ते श्रीनगर या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याद्वारे, भारतीय रेल्वे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आपली कनेक्टिव्हिटी स्थापित करेल.