Raj Thackeray : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे संतापले, तळपायाची आग मस्तकात गेली, ते सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं!
राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. तसेच दुबार मतदार दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टूल तयार केले आहे. त्यानुसार, ज्या मतदारांची दुबार नावे आहेत, त्या ठिकाणी दोन स्टार्स असतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी टीका केली आहे.