सहा तास चर्चा करून सुद्धा सुप्रिया सुळे अपयशी; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादीचा राजीनामा!!
पुण्याचे माजी महापौर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी खासदार सुप्रिया सुळे यांनी सहा तास चर्चा केली. त्यांचे मन वळवायचा प्रयत्न केला, पण त्यात सुप्रिया सुळे यांना अपयश आले. प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. अजित पवारांना असलेला विरोध कायम ठेवला.