Kamala Harris : कमला हॅरिस यांचा राजकारणातून संन्यास; म्हणाल्या- देशाची राजकीय व्यवस्था बिघडली, मी ती दुरुस्त करण्यास सक्षम नाही
अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. ‘द लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्या आता कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर पदासह कोणत्याही राजकीय पदासाठी निवडणूक लढवणार नाहीत.