Karnataka High Court : कर्नाटक हायकोर्टाने म्हटले- यूट्यूबवर खोट्या-आक्षेपार्ह बाबींचा प्रसार; हे रोखण्यासाठी मानहानी कायदा पुरेसा नाही
कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले की, आजकाल युट्यूबवर खोट्या आणि आक्षेपार्ह गोष्टी इतक्या सहजपणे पसरत आहेत की त्यांना रोखण्यासाठी केवळ मानहानीचा कायदा पुरेसा नाही. न्यायालयाने म्हटले आहे की, लोक निर्भयपणे बदनामी करत आहेत आणि वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस धोरण आखण्याची गरज आहे.