Maharashtra Civic Polls 2026 : द फोकस एक्सप्लेनर : महापालिका निवडणुकांत भाजपचा दिग्विजय, मुंबईत ठाकरे बंधूंना धोबीपछाड, तर पुणे-पिंपरीत पवारांची युती ‘फ्लॉप’!
महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, राज्याच्या राजकीय समीकरणांत मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. या निकालांनी महायुतीचे वर्चस्व अधोरेखित केले असून विरोधकांसाठी, विशेषतः पवार आणि ठाकरे गटासाठी हे निकाल आत्मचिंतन करायला लावणारे आहेत.