पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असणाऱ्या या कुटुंबाला स्वत:चा बचाव करण्याचीही संधी मिळाली नाही.
विशेष प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : येथील चिखली भागात आज पहाटे एक भयानक दुर्घटना घडली. येथील एका हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असणाऱ्या या कुटुंबाला स्वत:चा बचाव करण्याचीही संधी मिळाली नाही. A terrible accident in Pimpri Chinchwad Four members of the same family died in a fire at a hardware store
या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाची वाहनं घटनास्थळी दाखल झाली आणि आग विझवण्याचे काम सुरू झाले. मात्र तोपर्यंत चारही जणांनी जीव गमावला होता. चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय-१०) भावेश चौधरी (वय-१५) असं आगीत मृत पावलेल्यांची नावं आहेत.
चिखली परिसरातील सचिन हार्डवेअर दुकानात चौधरी कुटुंब वास्तव्यास होतं. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
A terrible accident in Pimpri Chinchwad Four members of the same family died in a fire at a hardware store
महत्वाच्या बातम्या
- उत्तराखंडमध्ये यावर्षीच लागू होणार समान नागरी संहिता, मुख्यमंत्री धामींची मोठी घोषणा!
- इस्रोच्या स्थापनेत नेहरूंचे नव्हे, TIFR चे योगदान; वाचा आणि ऐका सत्य इतिहास!!
- चांद्रयान-३च्या रोव्हर ‘प्रग्यान’ने पृथ्वीवासीयांसाठी पाठवला खास संदेश! जाणून घ्या, काय म्हटले?
- सिलेंडरचे भाव मोदींनी उतरवले; काँग्रेसच्या पोटातले “गॅस” सुटले!!