PF : खुशखबर : PF ऑटो क्लेम मर्यादा ₹5 लाखांपर्यंत वाढणार; CBTच्या मंजुरीनंतर निर्णय लागू होणार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खात्यातून अॅडव्हान्स क्लेमच्या ऑटो सेटलमेंट (ASAC) ची मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी २८ मार्च रोजी श्रीनगर येथे झालेल्या ईपीएफओच्या कार्यकारी समितीच्या (ईसी) ११३ व्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला.