Supreme Court : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरीची याचिका फेटाळली; हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टातूनही विरोधकांना दणका
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड झाली असल्याचा आरोप करत संपूर्ण विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला आहे. मात्र, विरोधी पक्षाला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. ही तक्रार महाराष्ट्र उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी योग्य मानली नाही. जूनमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते, जे सोमवारी फेटाळण्यात आले आहे.