पवार काका – पुतण्यांची मजबुरीची युती; एकेक प्रभागात चार सक्षम उमेदवार देताना दोन्ही राष्ट्रवादींची दमछाक!!
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये जी प्रभाग रचना निर्माण करून ठेवली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा प्रादेशिक पक्षांची पुरती राजकीय गोची होऊन बसली आहे. कारण एकेका प्रभागात चार सक्षम उमेदवार आणायचे कुठून??, या सवालाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना आणि मनसे यांच्यासारखे सगळे छोटे पक्ष आणि त्यांचे नेते हैराण झालेत.