Pakistanis : भारतातून गेले नाही तर पाकड्यांना 3 वर्षे शिक्षा, ₹3लाख दंड; 537 पाकिस्तानी परतले
रविवारी संध्याकाळी केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी एक नोटीस जारी केली आहे. जर कोणताही पाकिस्तानी निर्धारित मुदतीत भारत सोडून गेला नाही, तर त्याला अटक केली जाईल आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. अशा नागरिकांना ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा ३ लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.