• Download App
    पाकिस्तान्याशी मोबाईलवरून बोलताना गुप्तचर विभागाने पकडले, हेरगिरी करणाऱ्या शिक्षिका बहिणींना अटक|Intelligence operatives caught talking to Pakistanis on mobile phones, spying teacher sisters arrested

    पाकिस्तान्याशी मोबाईलवरून बोलताना गुप्तचर विभागाने पकडले, हेरगिरी करणाऱ्या शिक्षिका बहिणींना अटक

    भारतीय लष्कराचे केंद्र असलेल्या महू येथे पाकिस्तानासाठी हेरगिरी करणाऱ्या दोघां बहिणींना मध्य प्रदेशातील इंदौरमधून अटक करण्यात आली आहे. इंदौरजवळील महू येथील सैन्य छावणीत हेरगिरी करत असल्याचा या दोघींवर आरोप आहे. या दोघी शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्या मोबाईलवरून बोलत असताना त्यांची फ्रिक्वय्न्सी गुप्तचर विभागाने पकडली.Intelligence operatives caught talking to Pakistanis on mobile phones, spying teacher sisters arrested


    विशेष प्रतिनिधी

    इंदूर : भारतीय लष्कराचे केंद्र असलेल्या महू येथे पाकिस्तानासाठी हेरगिरी करणाºया दोघां बहिणींना मध्य प्रदेशातील इंदौरमधून अटक करण्यात आली आहे.

    इंदौरजवळील महू येथील सैन्य छावणीत हेरगिरी करत असल्याचा या दोघींवर आरोप आहे. या दोघी शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्या मोबाईलवरून बोलत असताना त्यांची फ्रिक्वय्न्सी गुप्तचर विभागाने पकडली.



    या दोघी बहिणी महू येथील एका शाळेत शिकवायचं काम करत होत्या. यातील एकीचं वय ३२ तर एकीचं वय २८ वर्षे आहे. पाकिस्तानातील मोहसीन खान आणि दिलावर यांच्या संपर्कात असल्याचे उघड झालं आहे.

    अटक केल्यानंतर गुप्तचर विभाग आणि स्थानिक पोलीस कसून तपास करत आहे. इंदौरच्या गवळी पलासिया भागात त्या राहतात.गेल्या काही दिवसांपासून त्या पाकिस्तानमधील व्यक्तींशी संपर्कात होत्या आणि महू सैन्य छावणीची माहिती पुरवत होत्या.

    काही दिवसांपूर्वी दोघी जणी रस्त्यावरून जात असताना पाकिस्तानातील व्यक्तींशी बोलत होत्या. या दरम्यान गुप्तचर विभागाने त्यांच्या फोनची फ्रिक्वेंसी पकडली आणि त्यांचं बिंग फुटलं.

    त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्यावर सतत चार दिवस पाळत ठेवली होती. अखेर त्यांच्या संशयास्पद हालचाली वाढल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं. चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली आहे.

    त्यांच्याकडील लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या दोघी पाकिस्तानी गुप्तहेरांशी गेल्या वर्षभरापासून संपर्कात होत्या. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर खोटी ओळख असलेली खातीही तयार केली होती.

    संशय येऊ नये म्हणून दोघींनी चार महिन्यात चार सिमकार्ड विकत घेतली होती. तसेच त्यांना मॉरिशसमधून फंडिंग होत असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.

    Intelligence operatives caught talking to Pakistanis on mobile phones, spying teacher sisters arrested

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही