Owaisi : वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध ओवेसी सुप्रीम कोर्टात; काँग्रेस खासदारांचीही याचिका; मोदी म्हणाले- विधेयकामुळे पारदर्शकता वाढेल
वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या. बिहारमधील किशनगंज येथील काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद आणि AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ही याचिका दाखल केली आहे.