Rahul Gandhi : निवडणूक आयोगाने राहुल गांधींकडून मत चोरीचे पुरावे मागितले; नोटिसीमध्ये म्हटले- महिलेच्या दोनदा मतदानाचा दावा चुकीचा
कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (CEO) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून त्यांच्या मतचोरीच्या विधानाचे पुरावे मागितले आहेत. ७ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १ लाखाहून अधिक मते चोरीला गेल्याचा आणि एका महिलेने दोनदा मतदान केल्याचा आरोप केला होता.