Nilesh Rane : नीलेश राणे म्हणाले- रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल माझ्या मनात आदर, आमच्यात वाद नाही
माझ्या मनात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आदर आहे आणि तो कायम राहणार आहे. माझ्यात आणि रवींद्र चव्हाण यांच्यात कसला वाद होता? मी स्वबळावर निवडणूक लढवली. माझी इच्छा होती की युती व्हावी पण ती झाली नाही, मी पाठलाग करत एका ठिकाणी पोहोचलो आणि तो जनतेसमोर ठेवला, असे म्हणत शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी शिवसेना-भाजप वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.