NIA raids : दहशतवादी कटाचा तपास करण्यासाठी एनआयएचे जम्मू-काश्मीरसह पाच राज्यांमध्ये २२ ठिकाणी छापे
भारतामध्ये सक्रिय असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने सोमवारी सकाळपासून मोठी मोहीम उघडली. जम्मू-काश्मीरसह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांमधील एकूण २२ ठिकाणी समांतर धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत अनेक संशयितांवर चौकशी करण्यात आली असून, मोबाईल फोन, लॅपटॉप, हार्डडिस्क, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची नोंद असलेले पुरावे जप्त करण्यात आले.