Nepal objects : नेपाळ म्हणाला- भारतीय यात्रेकरूंनी लिपुलेखमार्गे मानसरोवरला जाऊ नये; हा आमचा प्रदेश
नेपाळ सरकारने भारतीय यात्रेकरूंना लिपुलेख मार्गे कैलास मानसरोवर यात्रा न करण्याचे आवाहन केले आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी निवेदन जारी करून म्हटले आहे की, 1816 च्या सुगौली करारानुसार, लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी प्रदेश नेपाळचा भाग आहे.