Sharad Pawar : शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात, मंत्री संजय शिरसाट यांचे वक्तव्य
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले की, अजित पवार सत्तेत आहेत, ते कुठे जाणार नाहीत. परंतु, शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.