NCERT : भारताच्या लष्करी ताकदीची विद्यार्थ्यांना होणार ओळख, ऑपरेशन सिंदूर’चा अभ्यासक्रमात समावेश
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील कारवाईवर आधारित दोन विशेष अभ्यास मॉड्यूल्स तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या विशेष धड्यांद्वारे विद्यार्थ्यांना भारताच्या लष्करी ताकदीची ओळख करून देण्याचा उद्देश आहे.