CM Fadnavis : महाराष्ट्रातील पूर स्थितीवर मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, पंतप्रधान मोदींकडे एनडीआरएफ अंतर्गत भरीव मदतीची मागणी
राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तपशील सादर केला