Nana Patole : नाना पटोलेंचा संग्राम थोपटेंना सल्ला- ज्या पक्षाने मोठे केले त्याच्यावर आरोप करायचे नसतात!
काँग्रेस पक्षात मला सातत्याने डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृत जाहीर केले आहे. यावर आता कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत संग्राम थोपटे यांना सल्ला दिला आहे.