• Download App
    MPSC Online Exam | The Focus India

    MPSC Online Exam

    MPSC Online Exam : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा; ऑनलाइन परीक्षेचा निर्णय लांबणीवर, ऑगस्ट 2027 पासून होणार अंमलबजावणी

    विविध विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या मागण्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत होणाऱ्या बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत, एमपीएससीची संगणकआधारित (ऑनलाईन) परीक्षा पद्धत लगेचच लागू न करता, ती ऑगस्ट २०२७ पासून अंमलात आणण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तोपर्यंत सर्व परीक्षा या सध्याच्या प्रचलित (ऑफलाईन) पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत.

    Read more