Parliament : संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेस सरकार तयार; लोकसभेत 16 आणि राज्यसभेत 9 तास चर्चा होणार
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. पुढील आठवड्यात, या मुद्द्यावर लोकसभेत १६ तास आणि राज्यसभेत ९ तास चर्चा होईल. तथापि, विरोधकांचे म्हणणे आहे की, चर्चा अधिवेशनाच्या सुरुवातीलाच झाली पाहिजे आणि पंतप्रधान मोदींनी त्यावर प्रतिक्रिया द्यावी.