• Download App
    पावसाळी अधिवेशनात पेगासस हेरगिरीचीच चर्चा, आता शिवसेनेची जेपीसी चौकशीची मागणी । Monsoon Session Shiv Sena MP Demands JPC investigation in pegasus spying to Lok Sabha Speaker Om Birla

    पावसाळी अधिवेशनात पेगासस हेरगिरीचीच चर्चा, आता शिवसेनेची जेपीसी चौकशीची मागणी

    Monsoon Session : लोकसभेत पेगासस फोन हेरगिरी प्रकरणावरून सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. Monsoon Session Shiv Sena MP Demands JPC investigation to Lok Sabha Speaker Om Birla


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लोकसभेत पेगासस फोन हेरगिरी प्रकरणावरून सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले.

    शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात पक्षाच्या गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, सदाशिव लोखंडे, कृपाल तुमाने, धैर्यशील माने आणि बाळू धानोरकर यांनी जेपीसीकडून पेगासस फोन हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. विरोधामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला असून संसदेच्या कामकाजावरही मोठा परिणाम झाला आहे.

    भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याची षडयंत्र

    पेगासस प्रकरणावर आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, एका वेब पोर्टलवर खळबळजनक बातमी प्रसिद्ध झाली होती. बातम्यांमध्ये बरेच मोठे आरोप केले गेले. हा अहवाल संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी आला, तो योगायोग असू शकत नाही. ते म्हणाले की, भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. या हेरगिरी घोटाळ्याशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

    काय आहे प्रकरण?

    गार्डियन वृत्तपत्राने असा दावा केला आहे की, भारत सरकारने बर्‍याच पत्रकार, राजकारण्यांवर हेरगिरी केली आहे. भारतातील 40 हून अधिक पत्रकारांचे फोन हॅक झाल्याचा दावा केला जात आहे. हे दावे केले गेले आहेत असे सांगून अनेक मोबाईल फोनची फॉरेन्सिक तपासणी केली गेली. द वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डियन यासह जगातील 17 वृत्तसंस्थांनी ‘द पेगासस प्रोजेक्ट’ नावाची रिपोर्ट प्रकाशित केली आहे, ज्यामध्ये केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील हजारो लोकांचे फोन हॅक केल्याची घटना चव्हाट्यावर आल्या आहेत.

    Monsoon Session Shiv Sena MP Demands JPC investigation in pegasus spying to Lok Sabha Speaker Om Birla

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुप्रीम कोर्टात याचिका- NOTA ला जास्त मते पडल्यास निवडणूक रद्द करावी; निवडणूक आयोगाला नोटीस

    काश्मीरच्या सोपोरमध्ये 2 दहशतवादी ठार, 2 जवान जखमी; 2 दिवसांपासून ऑपरेशन सुरू

    काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणून नसीम खानांची नाराजी, पण ओवैसींच्या AIMIM ने केली त्यांची गोची!!