Modi-Trump : मोदी-ट्रम्प यांची अर्धातास ऑपरेशन सिंदूरवर फोनद्वारे चर्चा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सुमारे ३५ मिनिटे फोनवर जोरदार चर्चा झाली. ही माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. या संभाषणामुळे राजनैतिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांनी काही दिवस आधीच भारताने केलेल्या “ऑपरेशन सिंदूर” बद्दल उघडपणे चर्चा केली. ही तीच लष्करी कारवाई आहे ज्यामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते.