अर्बन नक्षलवाद्यांना मोडून काढत असतानाच उच्चशिक्षित इस्लामी जिहादी दहशतवाद्यांचे मोदी सरकार समोर नवे आव्हान!!
देशातल्या नक्षलवादाला वेसण घालून अर्बन नक्षल्यांचेही आव्हान मोडीत काढत असताना केंद्रातल्या मोदी सरकार पुढे उच्चशिक्षित इस्लामी जिहादी दहशतवाद्यांचे नवे आव्हान उभे राहिले आहे.
मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यांच्या तपास यंत्रणा यांच्यात चांगला समन्वय राखून नक्षलवादाचे आव्हान मोडून काढत आणले. देशातल्या पूर्वपट्ट्यात 115 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. तो कमी करत आणून आता 11 जिल्ह्यांपुरता सीमित केला महाराष्ट्र छत्तीसगड ओडिषा या राज्यांमध्ये बडे नक्षलवादी शरण आणले किंवा त्यांना मारले. त्याचबरोबर शहरी नक्षलवाद्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून त्यांच्या नक्षलवादाला असलेला बौद्धिक इंधनपुरवठा मर्यादित करून ठेवला. मोदी सरकारचे हे यश विशिष्ट पातळीवर लक्षणीय ठरले.