Bhagwant Mann : भगवंत मान यांची पीएम मोदींच्या परदेश दौऱ्यावरून टीका, परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आक्षेप
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी आक्षेप घेतला. परराष्ट्र मंत्रालयाने मान यांचे विधान बेजबाबदार असल्याचे म्हटले आणि असे विधान कोणत्याही राज्याच्या प्रमुखाला शोभत नाही असे म्हटले.