MLA Prakash Surve : शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान; प्रकाश सुर्वे म्हणाले- मराठी आई, तर उत्तर भारत मावशी; आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरता कामा नये
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमात बोलताना सुर्वे यांनी वादग्रस्त विधान केले की, मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे. या वादग्रस्त विधानामुळे सुर्वे यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला आयते कोलित दिले आहे, तसेच त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी वादाला आणखी हवा मिळून मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.