• Download App
    maratha reservation | The Focus India

    maratha reservation

    Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते म्हणाले- मनोज जरांगेंना कायद्यासमोर मोठे समजू नये, आंदोलन आटोपते घेऊन त्याला त्याच्या गावी धाडा

    मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र टीका केली आहे. त्यांनी मनोज जरांगेला कायद्यापेक्षा मोठे समजू नये, असे म्हटले आहे. जरांगेचे आंदोलन आटोपते घेऊन त्याला त्याच्या गावी धाडावे, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.

    Read more

    Shinde Committee : मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचे तत्त्वतः मान्य; शिंदे समितीचा जरांगेंना शब्द

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समितीला चर्चेसाठी पाठवून राज्याच्या राज्य सरकारसह राज्याच्या राजभवनाचा व दोन्ही कायदेमंडळांचा अपमान केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी केला. सरकारने आमच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाला पाठवण्याची गरज होती. पण त्यांनी शिंदे समितीला पाठवले. हे साफ चूक आहे. असे करून फडणवीसांनी राज्याचा अपमान केला, असे ते म्हणाले. दरम्यान, न्या. संदीप शिंदे समितीने यावेळी मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी असल्याचे तत्वतः मान्य केले. हा मराठा समाजासाठी एक मोठा दिलासा असल्याचा दावा केला जात आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका; म्हणाले – दोन समाज झुंजवणे योग्य नाही, संविधानाच्या चौकटीतच तोडगा काढावा लागणार

    दोन समाजात तेढ निर्माण करणे आमच्या तत्त्वात बसत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. एका समाजाला संतुष्ट करण्यासाठी दुसऱ्या समाजाला असंतुष्ट करणे सरकारला मान्य नसल्याचेही ते म्हणालेत. सगळ्याचे समाधान काढण्यावर आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले. राज्यात युती आणि महायुतीच्या सरकारनेच मराठा समाजासाठी चांगले निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    Read more

    Laxman Hake : महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे त्यांच्या समर्थांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत थेट इशारा दिला आहे.

    Read more

    Ramdas Athawale : मंत्री रामदास आठवलेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा; रिपाइंचा ठराव मंजूर

    मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा पाठिंब्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत- कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही; पण मराठा नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही मराठा समाजासाठी हिताची नाही, असे ते म्हणालेत. तसेच मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे जरांगेंना हाणला.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक

    मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत हे जरांगे यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चांबाबत मोठा खुलासा केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झाली नाही. तसेच मंत्री उदय सामंत आणि माझ्यातही त्याबाबत काही बोलणे झालेले नाही, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांना भाजपची विनंती- मुंबईतील मोर्चा पुढे ढकला; गणेशोत्सवात विघ्न आणू नये- मुख्यमंत्री फडणवीस

    मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा सामाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. 27 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यात आता गणेशोत्सव सुरू होणार असून मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी असते. अशात आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता असल्याने भाजपकडून मनोज जरांगे यांनी आंदोलन पुढे ढकलावे अशी विनंती करण्यात आली आहे.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil : शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ; सरकारने जरांगेंची मागणी केली मान्य; विखे पाटलांची माहिती

    मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यानंतर देखील जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना म्हटले की हे फडणवीसांचे षड्यंत्र असून मी ते उधळून लावणार असल्याचा इशारा दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Gunaratna Sadavarte : मनोज जरांगे मुंबईत आलेच तर जेलमध्ये जावे लागणार; गुणरत्न सदावर्तेंचा दावा

    मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. न्यायालयाचा हा निर्णय येताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देत जरांगेंवर टीका केली आहे. तसेच ते मुंबईत आले तर जेलमध्ये जावे लागणार, असा दावा देखील सदावर्ते यांनी केला आहे.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचना- मनोज जरांगेंवर प्रतिक्रिया देऊ नका

    मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला असून, मनोज जरांगे २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. हायकोर्टाने त्यांना मुंबई येण्यापासून मनाई केली असली, तरी ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मात्र सावध भूमिका घेत मौन बाळगल्याचे दिसून येत आहे. त्यातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल माध्यमांसमोर कोणतेही विधान न करू नका, अशी सक्त ताकीद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.

    Read more

    Jarange Patil : जरांगे म्हणाले- मराठा आरक्षण द्या, अन्यथा सरकार उलथवून टाकू, मुंबईत बेमुदत उपोषणाला बसणार

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात १० टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा सरकार उलथवून टाकू, असा अल्टिमेटम मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी सोमवारी दिला. आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मुंबईत २९ तारखेपासून आपण व मराठा कार्यकर्ते बेमुदत उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    Read more

    Girish Mahajan : गिरीश महाजन यांचा आरोप- उद्धव ठाकरेंनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खायचे काम केले

    मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी बडबड करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन बोलावले, कार्यकर्त्यांना कामाला लावावे. याला त्याला बोगस म्हणण्यापेक्षा तुमचे काय? तुम्हाला लोकांनी अडीच वर्ष दिले होते. खरेतर लोकांनी तुम्हाला दिले नाही, तुम्ही दगाबाजी करून ते घेतल्याची टीका महाजन यांनी केली आहे.

    Read more

    Jarange : जरांगे म्हणाले- ही मराठ्यांची शेवटची लढाई, आरक्षण घेऊनच परतू; 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन

    मराठा आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही, आरक्षणाचा गुलाल उधळूनच यायचे, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केले. मुंबईतील आझाद मैदानात २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राजकारण्यांचे ऐकून घरी थांबू नका, प्रत्येकाने मुंबईला या, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. पण मुंबईत आलेल्या एकाही आंदोलकाला काठी जरी लागली तर महाराष्ट्रात एकाही

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले- 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार; फडणवीसांवर समाजाचा राग

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. ते २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. पूर्वतयारीसाठी बुधवारी सोलापुरात आले होते. दिवसभर मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी, ‘एक घर, एक गाडी’ असा नारा दिला. आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजाचा राग असून भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला नको.’

    Read more

    Manoj Jarange : आता वाशी-बिशी नाही, थेट मंत्रालयावर धडकणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा, 29 ऑगस्टला समाजबांधवांसह मुंबईत मोर्चा

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून, मुंबईत मंत्रालयावर थेट धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 27 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. दोन दिवसांत मुंबई गाठून 29 ऑगस्ट रोजी तेथे शांततेत आंदोलन होणार आहे. रविवारी आंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा केली.

    Read more

    Maratha reservation : द फोकस एक्सप्लेनर : मराठा समाजाच्या SEBC आरक्षणाला अद्याप स्थगिती नाही, पुढे काय? वाचा सविस्तर

    मराठा समाजासाठी दिलेलं SEBC (Socially and Educationally Backward Class) आरक्षण सध्या लागू आहे आणि त्यावर कोणतीही स्थगिती (stay) दिलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर बुधवारी विशेष खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानुसार उच्च न्यायालयाने सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी सुरू केली आहे. या सुनावणीमुळे मराठा विद्यार्थ्यांना सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी SEBC आरक्षणाचा लाभ मिळत राहणार आहे.

    Read more

    Maratha reservation : मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका तत्काळ हातावेगळ्या करा; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाला आदेश

    मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेऊन त्या तत्काळ हातावेगळ्या करा, असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाला दिले. न्यायालयाने या प्रकरणी हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना एक नवे खंडपीठ स्थापन करण्याचेही निर्देश दिलेत.

    Read more

    Maratha reservation : मराठा आरक्षणाची नव्याने होणार सुनावणी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

    मराठा अरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिल आहे. या प्रकरणाची सुनावणी आता पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुरुवातीपासून पुन्हा सुनावणी होणार आहे.

    Read more

    Manoj Jarange : 17 छोट्या समूदायांचा ओबीसींमध्ये समावेश करण्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा आक्षेप!!

    विशेष प्रतिनिधी बीड : Manoj Jarange  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने 17 छोट्या – मोठ्या जात समूहांचा ओबीसीमध्ये समावेश केला. शिंदे फडणवीस […]

    Read more

    Shambhuraj Desai : मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी महत्त्वाची बैठक, हैदराबाद गॅझेट शिंदे समितीकडे सुपूर्द

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ बैठकीचे प्रमुख चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई (  Shambhuraj Desai ) तसेच अन्य मंडळींसोबत बैठक […]

    Read more

    Maratha Reservation : मराठा आरक्षण : हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचे सरकारचे प्रयत्न, 17 सप्टेंबरला घोषणा होण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : हैदराबादच्या गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला ( Maratha Reservation)  ओबीसीतून आरक्षण देण्याची घोषणा 17 सप्टेंबरपूर्वी केली जाऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या तिसऱ्या आघाडीत प्रवेशाची चर्चा; प्रत्यक्षात निवडणुकीनंतर मराठा आंदोलन कमजोर करण्याचा इरादा!!

    नाशिक : Manoj Jarange मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांच्या तोंडी जास्तीत जास्त पाडण्याची भाषा सुरू आहे. ते अधून मधून निवडणूक लढविण्याच्या गोष्टी करतात. परंतु, […]

    Read more

    Manoj Jarange : महायुती + महाविकास आघाडीतल्या नाराजांना जरांगेंच्या उमेदवारीचे दरवाजे सध्यातरी बंद!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Manoj Jarange : विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून भाजपच्या मागे हात धुवून लागलेल्या मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीची जय्यत […]

    Read more

    Maratha Reservation : मराठा आरक्षणाची मागणी आणि आंदोलने खूप जुनी; पण मनोज जरांगेंनी आज साजरी केली वर्षपूर्ती!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Maratha Reservation  महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी आणि आंदोलने खूप जुनी, पण मनोज जरांगे यांनी आज साजरी केली वर्षपूर्ती!!, हे आज अंतरवली […]

    Read more