Laxman Hake : महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे त्यांच्या समर्थांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत थेट इशारा दिला आहे.