Manoj Jarange : अंजली दमानियांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट; संतोष देशमुख हत्याप्रकरणी चर्चा
तीन दिवसांपूर्वी एका सभेत मनोज दादांना चक्कर आली होती. म्हणून तब्येतीची विचारपूस करावी, आतापर्यंत भेटलो नव्हतो. फक्त फोनवर चर्चा झाली. पुढे त्यांना काही आमची मदत हवी असेल, ताकद येण्यासाठी म्हणा, मी नक्कीच त्यांच्यासाठी उभी असणार आहे. तसेच संतोष देशमुख हत्याप्रकरणाबाबत पुढे काय दिशा ठरवायची, यावर चर्चा झाली असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.