Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले- एकतर विजयी यात्रा, नाहीतर अंत्ययात्रा; आम्ही OBC सोबत जाणारच!
सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना खडसावले आहे. यावेळी बोलताना जरांगे यांनी म्हटले की सन्मान दिला नाही तर नेते आंदोलनस्थळी यायला घाबरतील. सन्मानाने येऊ द्या आणि सन्मानाने पाठवा, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. एकतर विजयी यात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल, असेही यावेळी जरांगे म्हणाले.