Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांनी केली उपोषण सोडण्याची घोषणा; आता झकपक आंदोलन करणार
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, आता त्यांनी हे उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा मारेकरी कोण आहे हे आता समोर आले आहे, मराठा समाजाचे डोळे उघडले आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.