Mamata government : ममता सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा झटका
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ममता सरकारला मोठा झटका बसला आहे. २५,००० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.