Maharashtra : औष्णिक केंद्रातील राखेच्या वितरणासाठी महाराष्ट्राचे आता नवे धोरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात औष्णिक केंद्रातील राखेच्या विक्रीसंदर्भात नव्या सर्वंकष धोरणाची घोषणा केली. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सध्या 100 टक्के लिलावाची अंमलबजावणी होत असली तरी स्थानिक उद्योगांना प्राधान्य देऊन त्यांचावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.