• Download App
    maharashtra | The Focus India

    maharashtra

    Ajit Pawar : महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी शिकली पाहिजे; उद्योजकाच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    पुण्यात एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला. यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आधीच भाषेचा वाद सुरू असताना अशा प्रकारच्या नाऱ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील एका उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंना आव्हान केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Laxman Hake : लक्ष्मण हाके समाजात तेढ निर्माण करण्यासाठी वादग्रस्त विधाने करतात; महाराष्ट्रात फिरूही देणार नाही; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा इशारा

    दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी लक्ष्मण हाके हे जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करत असून, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस त्यांची चड्डी पिवळी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिला आहे. तसेच लक्ष्मण हाके यांची हालत भटक्या कुत्र्यासारखी करू, असेही त्यांनी म्हटले आहे. लक्ष्मण हाकेंना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही चव्हाण यांनी दिला. लक्ष्मण हाके यांच्यावर प्रतिक्रिया देताना सुरज चव्हाण यांची जीभ घसरल्याचे चित्र दिसून आले.

    Read more

    Warkari Wari : वारकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पंढरीच्या वारीदरम्यान मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत, परिपत्रक जारी

    हजारो मैल पायपीट, पाऊस-ऊन-वारा अंगावर झेलत आणि मुखी ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करत हजारो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारीदरम्यान एखाद्या अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासंदर्भातले नवे परिपत्रक महसूल विभागाने मंगळवारी जारी केले आहे.

    Read more

    Eknath Shinde : विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका; एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना कानपिचक्या

    मराठी भाषेबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही, मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आली तर ती सहन केली जाणार नाही, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षातील मंत्र्यांना आणि आमदारांना देखील कानपिचक्या दिल्या. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका, असे एकनाथ शिंदे मंत्र्यांना म्हणाले.

    Read more

    Hindi Language GRs Canceled हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जीआर रद्द; CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

    पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत हिंदी भाषेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

    Read more

    Eknath Shinde : शिवसेना हिंदूहृदय सम्राटांची, टोमणे सम्राटांची नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

    सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी जन्माला आलो नसलो, तरी मी जनतेला सोन्याचे दिवस दाखविले आहे. शिवसेना हा मालक-नोकरांचा पक्ष नाही, तर सच्चा शिवसैनिकांचा व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा एकनाथ शिंदे सामान्य कार्यकर्ता आहे. हा पक्ष तुमचा आहे, इथे काही कुणी मालक नाही. राजा का बेटा राजा नहीं बनेगा असे श्रीकांत शिंदेही म्हणाले होते.

    Read more

    Thackeray Brothers : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक; 5 जुलैला राज ठाकरेंचा मोर्चा, तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंचे धरणे आंदोलन

    हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी 5 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. तसेच त्रिभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Rahul Gandhi : निवडणूक आयोगाने राहुल गांधींना बोलावले; महाराष्ट्र निवडणुकीत झालेल्या हेराफेरीच्या आरोपांवर चर्चा करणार

    निवडणूक आयोगाने (EC) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी त्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. ANI नुसार, हे पत्र १२ जून रोजी मेलद्वारे आणि राहुल यांच्या निवासस्थानी देखील पाठवण्यात आले.

    Read more

    Eknath Shinde : अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा; निधी कुठे वितरीत होतो याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश

    अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे, त्यावर लक्ष ठेवा. तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली. यात निधी वाटपावरून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह राहुल गांधींना प्रत्युत्तर; किती काळ हवेत बाण सोडणार?

    राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नाही तर राहुल गांधी यांच्या अपमानास्पद पराभवाचे दुःख वाढले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते अजून किती काळ हवेत बाण सोडत राहणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

    Read more

    CM Fadnavis : त्रिभाषा सूत्रासंदर्भात वर्षावर आढावा बैठक; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय

    त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक आज रात्री पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    Read more

    Municipal Corporation Elections : मनपा निवडणुकांसाठी प्रभागरचना वेळापत्रक जाहीर; चार महिन्यांचा कालावधी, हे आहेत महत्त्वाचे टप्पे

    राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे अखेर गती मिळू लागली आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ऑक्टोबर 2025 मध्ये ही रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतरच महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

    Read more

    Maharashtra Government :राज्य सरकारचा मोठा निर्णय; राजकीय-सामाजिक चळवळींशी संबंधित फौजदारी खटले मागे घेणार, शासनादेश जारी

    महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राजकीय आणि सामाजिक आंदोलनांशी संबंधित प्रलंबित गुन्ह्यातील आरोपपत्र दाखल केलेले सर्व खटले मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. गृह विभागाने यासंदर्भातील शासकीय निर्णय (जीआर) 20 जून रोजी जारी केला आहे.

    Read more

    Supriya Sule : सुप्रिया सुळे म्हणाल्या- हुंडा घेतला तर लग्नाला जाऊ नका; महाराष्ट्र हुंडामुक्त होण्यासाठी प्रयत्न गरजेचे

    मुलगी आत्महत्या करते आणि आपण अजूनही हुंड्याविषयी बोलतोय, हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हुंडा प्रथेवर ताशेरे ओढले. तर महाराष्ट्र हुंडामुक्त व्हावा यासाठी समाजाच्या सर्व स्तरावर प्रयत्न होणं आवश्यक आहे. पुण्यात एका सुशिक्षित कुटुंबातील मुलीने केवळ हुंड्याच्या दबावामुळे आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

    Read more

    Fadnavis : बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही; फडणवीस यांचा ठाकरेंच्या टीकेवर पलटवार

    उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली होती. मराठी माणसांची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकांचे नोकर भेटीगाठी घेत आहेत,

    Read more

    Minister Bhuse : ​​​​​​​हिंदी सक्तीवर सरकारचे स्पष्टीकरण; पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना इच्छेनुसार तिसरी भाषा- शिक्षण मंत्री दादा भुसे

    पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या सरकारच्या वादग्रस्त निर्णयाचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणी एक पाऊल मागे घेतले आहे. या प्रकरणी त्यांनी सद्यस्थितीत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणालेत.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे हिंदीच्या सक्तीवर आक्रमक; सरकारला हिंदी शिकवून दाखवण्याचे आव्हान; सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र

    आपण हिंदू आहोत हिंदी नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी भाषेची शक्ती दक्षिण भारतातील राज्यात कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आज भाषा सक्ती करत आहात, उद्या इतरही सक्ती होऊ शकते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकावला जाईल, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी सरकारला दिलेली पत्र देखील त्यांनी वाचून दाखवले. तसेच त्यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिले असून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. या निर्णयामागे आयएएस लॉबी असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- राज ठाकरेंचा दोन भाषांचा आग्रह चुकीचा, देशात 3 भाषांचे सूत्र

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचे ठणकावून सांगितले. संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) 3 भाषांचे सूत्र लागू असेल, तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, असे ते म्हणालेत.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात आता हिंदी अनिवार्य भाषा नसणार; मुलांना तृतीय भाषा निवडण्याचा अधिकार, पण…

    महाराष्ट्रात हिंदीसाठी अनिवार्य हा शब्द काढून टाकण्यात आला आहे परंतु मराठी आणि इंग्रजीनंतर ती तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवण्याबाबत अनिवार्य हा शब्द मागे घेण्यात आला आहे, परंतु सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.

    Read more

    महाराष्ट्रात सुमारे 11.70 लाख हेक्टरवर पेरण्या, पाऊस चांगला होण्याची अपेक्षा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या मंत्रिमंडळ बैठकीची सुरुवात अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर राज्यातील पावसाळी परिस्थितीचा आणि खरीप हंगामातील पेरणी प्रगतीचा आढावा घेण्यात आला

    Read more

    Maharashtra Municipal Election : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची तयारी सुरू – १४ वर्षांपूर्वीचीच प्रभागरचना पुन्हा लागू

    राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले असून, ती २०११ च्या जनगणनेच्या आधारावर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात २०१७ मध्ये अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसारच नव्याने काही किरकोळ बदल करून ती रचना पुन्हा लागू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया सुरु केली असून, या प्रभाग रचनेवर आधारित निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.

    Read more

    Maharashtra महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट; वाचा मुख्यमंत्र्यांचे नीती आयोगाच्या बैठकीत भाषण

    राजधानी दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रातील पाच हजारांहून अधिक पाकिस्तानी, बहुतांश नागपुरात!

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात राहणारे पाकिस्तानी नागरिक परत येत आहेत. पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीयांचीही अशीच परिस्थिती आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, भारतातील सर्व राज्यांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची झडती घेतली जात आहे. राज्य सरकारे त्यांच्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा डेटा शेअर करत आहेत.

    Read more

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात

    महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रातील 10 हजार गरजू महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप केले जाणार आहे. नागपूर येथून दिनांक 20 एप्रिल रोजी गरजू महिलांना सवलतीच्या दरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

    Read more