• Download App
    Maharashtra political news updates | The Focus India

    Maharashtra political news updates

    Chandrakant Patil : ‘काँग्रेस ही बुडती नाव, राष्ट्रवादी त्यात का विलीन होईल?:सध्या भाजप हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम ‘चॉईस’- चंद्रकांत पाटील

    महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा काही विषय उरला नाही. त्यामुळे बातम्या चालवण्यासाठी काही तरी मुद्दा लागत असतो. मग त्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का? अशा चर्चा घडत असतात.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : “काँग्रेसला घरघर लागली, बुडत्या जहाजात कोण बसणार?”; शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर बावनकुळेंचा हल्लाबोल

    महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे वाटत नसल्याचे सांगतानाच त्यांनी काँग्रेसला “बुडते जहाज” संबोधत खोचक टोला लगावला.

    Read more

    Devendra Fadnavis : ‘मोदी केवळ सर्वाधिक काळ पंतप्रधान नाहीत, तर सर्वोत्कृष्टही’; फडणवीसांकडून गौरव, काँग्रेसला ‘बुडते जहाज’ म्हणत विरोधकांवर निशाणा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. देशाची अर्थव्यवस्था, डिजिटल क्रांती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि गरिबी निर्मूलन यांसारख्या क्षेत्रांतील प्रगतीची आकडेवारी मांडत त्यांनी मोदी यांचे कौतुक केले. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करत विरोधकांवरही टीका केली.

    Read more

    Dhananjay Munde : ‘आम्ही कायम १२वे खेळाडूच राहणार का?’ धनंजय मुंडेंची मंत्रिपदासाठी अप्रत्यक्ष मागणी; प्रफुल पटेल म्हणाले- ‘इशारा समजला’

    मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षातील अंतर्गत राजकारणाची झलक पाहायला मिळाली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून पक्षश्रेष्ठींसमोर मंत्रिपदाची इच्छा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. क्रिकेटचे उदाहरण देत त्यांनी, “आम्ही कायम १२वे खेळाडूच राहणार का?” असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनीही त्याला सूचक प्रतिसाद दिला आहे.

    Read more

    Laxman Hake : मराठा समाजाला OBCच्या सवलती देण्याच्या निर्णयावर लक्ष्मण हाके आक्रमक; न्यायालयात जाण्याचा इशारा

    महाराष्ट्र सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात OBC प्रवर्गाला मिळणाऱ्या काही सवलती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील मराठा आरक्षण आणि OBC आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. OBC आंदोलनाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत हा निर्णय न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे.

    Read more

    Sanjay Shirsat : ‘निदा खान प्रकरणाची सखोल चौकशी करा’; इम्तियाज जलील यांच्यावरही संशयाची सुई, संजय शिरसाट यांची मागणी

    छत्रपती संभाजीनगरातील चर्चित निदा खान प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नावही तपासात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.

    Read more

    Ravindra Chavan : विधान परिषदेच्या रणधुमाळीत बंडखोरीची धास्ती; ‘पक्षविरोधी मतदान टाळा’, रविंद्र चव्हाण यांचे आमदारांना आवाहन

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांनी आपल्या आमदारांना एकजूट राखण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. मतदानाच्या तोंडावर क्रॉस व्होटिंग आणि बंडखोरीच्या शक्यतांवर चर्चा सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमदारांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

    Read more

    CM Devendra Fadnavis : ‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांकडून एक-एक रुपया वसूल करणार; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरमार्गाने लाभ घेतलेल्या अपात्र लाभार्थी आणि फसवणूक करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, योजनेतील गैरव्यवहारातून चुकीच्या पद्धतीने मिळवलेली रक्कम वसूल केली जाईल. काही प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले असून दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

    Read more

    Sunil Tatkare : पार्थ पवारांच्या सक्रियतेचे तटकरे यांनी केले स्वागत; अजितदादांच्या निधनापूर्वीच राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा झाल्याचा दावा

    विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी आज अर्ज दाखल केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या राजकारणातील सक्रियतेचे स्वागत करताना, अजित पवार यांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले.

    Read more

    Supriya Sule : ‘लाडकी बहीण’ योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र? सुप्रिया सुळेंचा सरकारवर विश्वासघाताचा आरोप

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीनंतर तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या वृत्तामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. खासदार Supriya Sule यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत हा महिलांशी केलेला विश्वासघात असल्याचा आरोप केला आहे.

    Read more

    Manoj Jarange Patil : ‘काँग्रेसने तरी ओबीसींचे काय भले केले?’; वडेट्टीवारांवर जरांगेंचा पलटवार, धनंजय मुंडेंनाही दिला इशारा

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केलेल्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी तरी ओबीसी समाजासाठी काय केले? झोके बांधून दिले होते का?” असा सवाल करत जरांगेंनी वडेट्टीवारांवर निशाणा साधला. तसेच मराठा आणि ओबीसी समाजाने एकमेकांशी संघर्ष न करता सरकारविरोधात एकत्र लढले पाहिजे, असेही ते म्हणाले.

    Read more

    Wadettiwar : जरांगेंचे उपोषण संपल्यानंतर राजकारण तापले; ‘डबल ढोलकी सरकार’ म्हणत वडेट्टीवारांचा हल्लाबोल, हाकेंकडूनही तीव्र टीका

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले बेमुदत उपोषण अवघ्या १५ तासांत मागे घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडले असले,

    Read more

    CM Devendra Fadnavis : मराठा समाजाला न्याय देण्याचीच शासनाची भूमिका; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- दिलेल्या आश्वासनांवर सरकार ठाम

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते तथा मंत्री आज चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित होते. येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच चोंडीचा विकास आराखडा मंजूर झाला असून आचारसंहिता असल्याने काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले नसल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या उपोषणावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

    Read more

    Mahayuti : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादीला २ जागा

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वाधिक ११ जागांवर उमेदवार देणार असून शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा देण्याचे सूत्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    Manoj Jarange Patil : मराठा आंदोलन पुन्हा पेटणार; मनोज जरांगे-पाटील उद्यापासून उपोषणावर, सरकारचे शिष्टमंडळ भेटीस

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलक नेते Manoj Jarange Patil यांनी ३० मेपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र चर्चेत ठोस तोडगा न निघाल्याने जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.

    Read more

    Ravindra Chavan : विधान परिषदेच्या 12 जागांसाठी 48 नावांची यादी; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला

    राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे, या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये सध्या 12-5-2 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असून, त्यानुसार भाजप 12, शिंदेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी तिन्ही पक्षांचे प्रमुख लवकरच एकत्र बैठक घेऊन जागावाटपावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

    Read more