• Download App
    Local elections | The Focus India

    Local elections

    Raj Thackeray : राज ठाकरेंचा 96 लाख बोगस मतदारांचा आकडा खोटा, भाजपचा पलटवार; संभाव्य पराभवाच्या अनेक कारणांपैकी एक कारण असल्याचा आरोप

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमध्ये 96 लाख खोटे मतदार घुसवण्यासंबंधी केलेला आरोप धादांत खोटा असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांतील संभाव्य पराभवाच्या भीतीने 96 लाख खोटे मतदार असल्याचा धादांत कपोलकल्पित आकडा ठोकून दिला. हा आकडा कुठून आणला हे त्यांनाही माहिती नाही, असे भाजपने म्हटले आहे.

    Read more

    Harshvardhan Sapkal : मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याच्या चर्चेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विराम दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी स्पष्ट केले की, मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे सध्या यावर चर्चा करणे ‘जर-तर’च्या प्रश्नासारखे निरर्थक आहे. अशा प्रकारच्या आघाडीची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. काँग्रेसच्या भूमिकेनुसार, ही आघाडीची चर्चा फक्त इंडिया आघाडीच्या विद्यमान भागीदारांसोबतच पुढे जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Owaisi : असदुद्दीन ओवैसी म्हणाले- “फक्त पोस्टर नको, मोहम्मद यांचे विचारही मनात ठेवा”

    कोल्हापूर येथे एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोठी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी

    Read more

    Uddhav Thackeray’ : उद्धव ठाकरेंचे आमदार-खासदार भाजपच्या संपर्कात; स्थानिक निवडणुकांपूर्वी भाजपात दिसतील – गिरीश महाजन

    उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. केवळ तांत्रिक कारणांमुळे ते ठाकरे गटात असल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

    Read more