Laxman Hake : ओबीसी, भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून मी प्रामाणिकपणे भांडतोय, लक्ष्मण हाके यांची भावनिक पोस्ट
ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून मी प्रामाणिकपणे भांडतोय. आपले हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत, अशी भावनिक पोस्ट ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष होताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर सरकारने मराठा आरक्षणाबाबत जीआर काढला आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण देऊ नये, अशी ओबीसी समाजाची मागणी कायम आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत जीआर काढल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मेळावा आणि दौऱ्यांमधून ओबीसींना एकत्र करण्याचं काम करत आहेत. याचपार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील दैत्यानांदूर येथे शनिवारी ओबीसी मेळावा होणार आहे. मात्र या मेळाव्याआधी लक्ष्मण हाके यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.