Kolhapur : किरकोळ वादातून कोल्हापुरात दंगल, वाहनांची जाळपोळ
साऊंड सिस्टीम लावण्याच्या किरकोळ वादातून कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर मोठ्या दंगलीत झाले. सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवारी रात्री जमावाने हाणामारी, दगडफेक केली तसेच अनेक वाहनांची तोडफोड करून त्यांना पेटवले. पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 100 ते 150 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.