Karnataka High Court : कर्नाटक हायकोर्टाची शिफारस- देशात UCC लागू करा; संविधान निर्मातेही याला अनुकूल होते
कर्नाटक उच्च न्यायालयाने शनिवारी म्हटले की, देशात समान नागरी संहिता (UCC) लागू करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे सर्व नागरिकांना (विशेषतः महिलांना) समान अधिकार मिळतील. न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना संयुक्तपणे असा कायदा करण्याचे आवाहन केले आहे.